महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद जिल्हा परिषद कर्मचारी युनियन 1964 पासून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे न्याय, हक्कासाठी सातत्याने लढा देत आहे .आज जिल्हा परिषद अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना जे काही सेवा विषयक संरक्षण प्राप्त झालेले आहे ते केवळ आणि केवळ जिल्हा परिषद कर्मचारी युनियन मुळे. सेवा प्रवेशोत्तर परीक्षा हे चार वर्षात तीन संधीत पास होणे आवश्यक आहे. ही परीक्षा पुस्तकांसह असल्याने आपले कर्मचारी विहित संधीत चांगल्या मार्कने परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे .या उद्देशाने या ई Z P Act लायब्ररी स्थापित करण्यात आली आहे. सदरची संकल्पना जिल्हा परिषदेच्या सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे मॅडम यांनी दिल्यामुळे आज आपण सोलापूर जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी ही लायब्ररी स्थापित करीत आहोत.याचा सर्वांनी उपयोग सेवाप्रवेश, स्पर्धात्मक, व जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजात निश्चित होईल असे अपेक्षा व्यक्त करतो. सेवा प्रवेशोत्तर परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा.
धन्यवाद.